Soybean Procurement
खरेदी केलेले सोयाबीन राज्य वखार महामंडळाच्या 345 गोदामांमध्ये आणि भाडेतत्त्वावर दिलेल्या 252 खाजगी गोदामांमध्ये ठेवण्यात आले आहे. या हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली असून गोदामांची साठवण क्षमताही पूर्ण झाली असल्याची माहिती पणन विभागाने दिली आहे.
मुंबई :
Soybean Procurement
राज्य सरकारने 2024-25 च्या हंगामात 14 लाख 13 हजार 270 टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. 6 फेब्रुवारीपर्यंत 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून एकूण 11 लाख 21 हजार 385 टन सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीचे हे प्रमाण अन्य राज्यांपेक्षा जास्त अशी माहिती पणन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दिली.
Soybean Procurement
केंद्र सरकारने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल हमी भाव जाहीर केला असून, गेल्या वर्षीच्या हमीभावापेक्षा २९२ रुपये अधिक आहे.’नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या केंद्रीय नोडल संस्थांच्या अंतर्गत सहा राज्यस्तरीय नोडल संस्थांमार्फत शेतकरी नोंदणी आणि खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी ‘नाफेड’तर्फे ४०३ केंद्रांवर आणि ‘एनसीसीएफ’तर्फे १५९ केंद्रांवर एकूण ११ लाख २१ हजार ३८५ टन सोयाबीनची खरेदी ५६२ केंद्रांवर करण्यात आल्याचे पत्रकारांनी सांगितले.
1 ऑक्टोबर 2024 पासून सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू झाली. ही मुदत वेळोवेळी ६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 90 दिवसांची मुदत 12 जानेवारीपर्यंत होती.मात्र शेतकरी नोंदणीचे प्रमाण विचारात घेऊन केंद्राच्या परवानगीने खरेदीस पहिल्यांदा ३१ जानेवारीपर्यंत तर ६ फेब्रुवारीपर्यंत दुसर्र. मुदतवाढ देण्यात आली होती.
