सोनियांच्या वक्तव्यावर राष्ट्रपती भवनाचे प्रत्युत्तर
Rashtrapati Bhavan’s: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इतके
मोठे अभिभाषण करताना दमल्या. शेवटी त्यांना बोलणेही अवघड झाले होते, असे उद्गार काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काढल्याचे एका व्हिडीओतून निदर्शनास आले. त्या उद्गारांचा राष्ट्रपती भवनाने शुक्रवारी तीव्र शब्दांत निषेध केला, तर सोनिया गांधी यांच्या विधानांचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला, असा दावा काँग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीहीकाँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
दिल्ली : Rashtrapati Bhavan’s
मुर्मू यांच्या संसदेतील अभिभाषणाबाबत सोनिया गांधी यांनी काढलेले उद्गार राष्ट्रपतिपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे व अयोग्य आहेत, असे राष्ट्रपती भवनाने म्हटले. या नेत्यांना हिंदीसारख्या भारतीय भाषेतील वाक्प्रचारांची माहिती नसावी. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे उद्गार काढले असावेत, असेही राष्ट्रपती भवनाने नमूद केले आहे.

राष्ट्रपती
मुर्मू यांनी अभिभाषण संपविल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आपापसात चर्चा करताना दिसले. त्यावेळी सोनिया गांधींनी राष्ट्रपतींबद्दल वादग्रस्त उद्गार काढल्याचा आरोप आहे. राष्ट्रपती भवनाने म्हटले की, अभिभाषण करताना राष्ट्रपती थकल्या नव्हत्या. महिला, शेतकरी, वंचित समुदायांबद्दल राष्ट्रपती कळकळीने बोलल्या.
सोनिया गांधी यांच्या वक्तव्यामुळे त्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का लागला 3 आहे. त्यातून गांधी यांची सरंजामशाही मानसिकता दिसून येते अशी टीका भाजपने केली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले की, मुर्मु यांचा अवमान करण्याचा काँग्रेसने याआधीही प्रयत्न केला आहे