विधान परिषदेला दिलेल्या लेखी उत्तरात कृषीमंत्र्यांची कबुली Major fraud in crop insurance scheme
मुंबई : पंतप्रधान पीकविमा योजनेत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात गुरुवारी (ता. ६) दिली.
तसेच पीकविमा योजनेत विम्याचे दावे नाकारणे, ओरिएंटल कंपनीने २०२ कोटी वितरणास नकार दिला असून, Major fraud in crop insurance scheme
यंदाच्या हंगामातील पीकविमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचेही उत्तरात म्हटले आहे.
चेतन तुपे, भास्कर जाधव, मोहन मते, सुलभा खोडके, डॉ. राहुल पाटील यांच्यासह ३३ सदस्यांनी पीकविम्याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दुष्काळ,
अतिवृष्टी, नापिकी आणि अन्य कारणांनी पीकविम्यासाठी वेळेत व वस्तुनिष्ठ पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.
फळपीक’चेही प्रस्ताव रद्द
राज्यात अनेक ठिकाणी पीकविम्याप्रमाणे फळपिकांचे बोगस विमे काढण्यात आले होते. त्यातील १५ हजार ९०२ प्रस्ताव रद्द करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील १०७ सामायिक सुविधा केंद्रांच्या चालकांचा परवाना रद्द करण्यात आला असून,
२४ केंद्र चालकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहितीही उत्तरात दिली आहे.
Major fraud in crop insurance scheme
