वाचा सविस्तर :

मुंबई : Farmer ID 2025
Farmer ID 2025 केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अनिवार्य केले आहे. आधार कार्ड प्रमाणे शेतकऱ्यांना युनिक आयडी क्रॅमांक मिळणार आहे. महाराष्ट्रात शेतकरी ओळखपत्र काढण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आज आम्ही या ओळख पत्रामुळे शेतकऱ्यांना सारखे सारखे केवायसी करावे लागणार नाही. ते कसं हेच आपण जाणून घेणार आहोत..
शेतकरी ओळखपत्र काय आहे?
आधार कार्डप्रमाणेच, शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांची ओळख पटवण्याचे डिजिटल माध्यम असणार आहे. याचा वापर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि इतर कृषी संबंधित योजनांचे फायदे मिळविण्यासाठी केला जाईल. या ओळखपत्रात शेतकऱ्यांची जमीन, पशुधन, पीक आणि इतर तपशीलांची माहिती असेल.
वारंवार केवायसी करण्याचा त्रास संपला
सरकारच्या या नवीन उपक्रमामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय भरपूर मदत मिळणार आहे. शेतकरी आतयार झाल्यानंतर, शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. एकदा हे ओळखपत्र तयार झाले की सर्व योजनांचे लाभ सहज शकतात