शेतीमाल थेट ग्राहकांना विक्रीची योजना 20/102025
शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा सरकार यासाठी एका मॉडेलवर काम करत असल्याचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी (ता. २६) सांगितले. ज्यामुळे मध्यस्थांची भूमिका कमी होईल असेही ते म्हणाले.
शेतीमाल
नवी दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर सुमारे ४०० शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले, की ‘शेती ते ग्राहक’ या मॉडेलमुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळण्यास मदत होईल. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे.शेतीमाल
शे
शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार
शेतकऱ्यांशिवाय भारताची प्रगती होऊ शकत नाही. शेती हा राज्याचा विषय असला तरी केंद्र सरकार शेतकऱ्यांना सर्वंकष मदत करेल. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांचे योगदान मोलाची भूमिका असते. यासाठी केंद्रासह राज्य सरकारे तुम्हाला मदत करतील, असे ते शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी सांगितले.