
Gold Silver Price: मागच्या 24 तासात सोनं 642 रुपयांनी वाढलं तर चांदी १३०० रुपयांनी वाढली. GST आणि RTGS नुसार बघायचं झालं तर सोनं एक हजार १३०० रुपयांनी वाढलं तर चांदी जवळपास २००० रुपयांनी वाढल्याचं दिसतं आहे.

Gold Silver Price तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा स्वत:साठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल तर, खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती तुम्ही येथे मिळवू शकता.
24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. शुद्ध सोने किंवा 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्धता दर्शवते आणि त्यात मिसळलेले इतर कोणतेही धातू नसतात. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. सोन्यासाठी इतर वेगवेगळ्या शुद्धता आहेत आणि त्या 24 कॅरेटच्या तुलनेत मोजल्या जातात.