मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास १५ गावांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस गळू लागले. याचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारपासून अनेक एजन्सीज त्या गावांत गेल्या. तपासण्या झाल्या. नेमके काय घडले हे कोणीही सांगायला तयार नाही. मात्र विंचूदंशावर औषध शोधणारे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी स्वतः त्यांच्या टीमसह या भागाला भेट दिली. स्वखर्चाने या भागातील पाणी, धान्य, रक्ताचे नमुने यांची तपासणी केली. त्यातून आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत.ज्यांच्या डोक्यावरचे केस गळत आहेत, त्यांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण दहापींनी जास्त आढळून आले; तर शरीरातील रक्ताच्या नमुन्यात आवश्यक असणाऱ्या झिंकचे प्रमाण एकदम कमी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. या भागातील लोकांना पिण्याचे पाणी रोज विकत घ्यावे लागत Urdu, यासारखे दुर्दैव नसल्याचे डॉ. बावस्कर म्हणाले.
टक्कल पडण्याचे धक्कादायक कारण…
धक्कादायक निरीक्षणेया : भागातील जमीन खारपान पट्ट्यातील आहे. अल्कलाइन साँइलमुळे जिप्समचे प्रमाण कमी झाले आहे. मुळात जमीन अल्कलाइन, त्यात डीएपी, फॉस्फेट अशा खतांच्या अतिवापरामुळे मातीत येणाऱ्या धान्यात झिंकचे प्रमाण वाढत नाही व ते पाण्यात विरघळून जमिनीत मुरते. रेशन दुकानात मिळणाऱ्या गव्हातदेखील सेलेनियम वाढल्याची माहिती आयसीएमआर संस्थेने लक्षात आणून दिले. ते कुठून वाढले हा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याचे डॉ. बावसकर यांचे निरीक्षण आहे.
